महाराष्ट्राला बलशाली बनवणारा अर्थसंकल्प : – आमदार महेश लांडगे

 

महाराष्ट्राला बलशाली बनवणारा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. राज्यातील शेतकऱ्यांचा सन्मान, प्रोत्साहन देण्यासोबतच महिला प्रवाशांसाठी विशेष योजनांची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून सादर केलेला हा अर्थसंकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारा आहे. तसेच, पिंपरी ते निगडी मेट्रो विस्ताराची घोषणा करण्यात आली असून, त्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यासह बालेवाडी येथे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभारणीची घोषणा करुन शहराच्या क्रीडा क्षेत्रालाही चालना देण्याचा संकल्प अर्थसंकल्पात केलेला आहे. पर्यटन विकास, पायाभूत सोयी-सुविधा, आरोग्य, शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन, विद्यार्थ्यांसाठी विविध महत्त्वाकांखी योजना आणि विशेष म्हणजे महामानवांच्या स्मारकांसाठी निधीची तरतूद करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने मी शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व्यक्त करतो.

– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *