२८ वर्ष अबाधित कसबा गेला पण भाऊंच्या सहानुभूतीने चिंचवड अबाधीत

रोहित खर्गे –
दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेली  पोटनिवडणूक महाराष्ट्रात  चर्चेचा विषय ठरली. आख्या महाराष्टारचे लक्ष्य या दोन्ही निवडणुकीवर होते. पुण्यात कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी विषय वेगळे होते. दोन्ही ठिकाणी निवडणूक वेगळ्या पद्धतीने हाताळली जात होती. भाजपच्या दृष्टीने कसब्याची निवडणूक ही खूप प्रतिष्ठेची होती त्यामुळेच भाजपचे सगळे नेते पुण्यात तळ ठोकून होते.  अगदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ही या निवडणुकीदरम्यान पुण्यात येऊन गेले. खरे तर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर उमेदवारी त्यांच्या घरातूनच असावी असे सर्वानाच वाटत होते आणि तो त्यांचा हक्कही होता. त्यातही दोन प्रवाह झाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुक्ता टिळक यांच्या घरातीलच उमेवदवार असावा असे मत होते पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सगळी समीकरणे बदलवत ज्याप्रमाणे ते कोल्हापूरवरून येऊन कोथरूड वर येऊन बसले ते ब्राम्हण समाज्याला आवडले नव्हते त्यांनी ब्राम्हण समाज्याला गृहीत धरले.  तेच समीकरण परत चालेल असे त्यांना वाटले होते आणि त्यांनी मुक्ता टिळक यांच्या ऐवजी त्यांचे निकटवर्तीय तीन वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष असणारे हेमंत रासने यांना पसंती देत अगदी दिल्ली नेतृत्वाकडून हट्टाने रासने यांचे तिकीट घेऊन आले असे सूत्रांकडून समजते.
कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे जनमानसातील उमेदवार आहेत ही प्रतिमा पहिल्यापासून शेवटपर्यंत अबाधित राहिली. मनसेतून काँग्रेसमध्ये आलेले धंगेकर यांना मतदारांना आपली नव्याने ओळख करून देण्याची गरजच भासली नाही.
पहिल्यापासून धनशक्ती विरुद्ध  जनशक्ती असेच चित्र कासब्यातून पाहायला मिळाले. तेथे शिवभक्त बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु नंतर स्वतः काँग्रेस नेते राहुल गांधींचा फोन आल्यावर त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत प्रचारात पुन्हा सहभागी होत स्वतःला झोकून देऊन धंगेकरांचा प्रचार केला. तेथे भाजपकडून पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या क्लिपा सोशल मीडियावर फिरल्या. शेवटपर्यंत भाजपने प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक आपल्या बाजूने करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला पण त्याचा कोणताच फायदा झाल्याचे मतमोजणीतून दिसून आले. खरे तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अगदी तळागाळातील आणि जनतेशी नाळ जोडलेला योग्य उमेदवार दिल्याने अर्धी लढाई येथेच जिंकल्याचे जाणकार सांगतात. याउलट निधन झालेल्या मुक्ता टिळक या ब्राम्हण समाज्यातील असल्याने त्या समाज्यावर अन्याय झाल्याची भावना कासब्यातून उमटली.
चिंचवड येथे मात्र भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या घरातूनच त्यांच्या पत्नी अश्विनीताईं जगताप यांना उमेदवारी देऊन अर्धी लढाई भाजपने जिंकल्याचे चित्र होते.
चिंचवड येथे राहुल कलाटे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असे चित्र दिसत होते त्यानुसार कलाटे यांनी अगोदरच वंचितचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा केली होती परंतु खूप घडामोडींनंतर राष्ट्रवादिच्या नगरसेवकांनी आग्रही भूमीका घेत आमच्यातूनच एक उमेदवार द्या, आणि घड्याळ चिन्हवरच ही निवडणूक लढवा, इथे राष्ट्रवादीला मानणारा मतदार आहे,असा दबावच आणल्याने अजितदादा ही हतबल झाले आणि रात्रीतून उमेदवारी बदलून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. राहुल कलाटे यांची गणिते चुकली त्यांना समजावण्याचा खुद्द अजित पवार, सुनील शेळके सचिन अहिर यांनी प्रयत्न केले तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कलाटे यांना फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी त्यांना रिक्त विधानपरिषद आणि मावळ लोकसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासनही देण्यात आले,परंतु निवडणूक लढवायचीच असा पवित्रा घेतलेल्या राहुल कलाटे यांनी कोणाचेही ऐकले नाही, आणि अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज कायम ठेवला, ही भाजप चीच खेळी असल्याचे राजकीय जाणकार सांगतात, त्यामुळे जगताप यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

भाजपचे खासदार यांच्या माध्यमातून रवींद्र धंगेकर यांचा भाजप प्रवेश एकवेळ निश्चित झाला होता पण माजी सभागृह नेता गणेश बिडकर यांच्या कडाडून विरोधामुळे धंगेकर यांचा भाजप प्रवेश होऊ शकला नाही, आणि भाजप चांगल्या उमेदवाराला मुकला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली, कसब्यातून पहिल्यापासूनच जनमानसात बोलबाला असलेले रवींद्र धंगेकर यांनी गल्लोगल्ली पिंजून काढली आणि जसजशी निवडणुकीची वेळ जवळ येत होती तसतशी त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळात असल्याचे दिसून आले, उमेदवार चुकल्याने अगोदरच नाचक्की झालेल्या भाजपचे कार्यकर्ते सैरभैर होऊन पैशांचा वापर करण्यावर भर देताना दिसले, अनेकदा त्याच्या व्हिडीओ क्लिप्स ही माध्यमांमध्ये व्हायरल झाल्या, दुखवलेला ब्राह्मण समाज काय भूमिका घेतो, हेही निर्णायक ठरले, याच दरम्यान भाजपने केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांसह राज्यातील बड्या नेत्यांचा लवाजमा तळ ठोकून होता तर महाविकास आघाडीकडून नियोजन बद्ध प्रचार सुरू होता, त्यातच त्यांना धंगेकर यांच्या आधीच्या मनसे संपर्काचा फायदा झाला. आणि 28 वर्षे अबाधित असलेला भाजपचा गड धंगेकर यांनी सहज हस्तगत केला.

चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ यांनी 38 वर्षे चिंचवड वर एकहाती अधिराज्य गाजवले, त्यांचा जनसंपर्क व केलेले कार्य यांमुळे त्यांच्या पत्नी अश्विनीताई यांना सहानुभूती मिळाली आणि त्याचे रूपांतर मतांमध्ये झाल्याचे दिसून आले, लक्ष्मणभाऊंच्या निवडणुकीत त्यांची प्रचार यंत्रणा आणि पडद्यामागील नियोजन हाताळणारे शंकर जगताप यावेळीही आक्रमकपणे व तितक्याच संयमाने प्रचार यंत्रणा हाताळताना दिसले त्यांना तितकीच साथ शहराध्यक्ष व आमदार महेशदादा लांडगे यांची माजी नगरसेवक ज्येष्ठ कार्यकर्ते व महिला युवा फळीची तितकीच मोलाची साथ मिळाली, त्यातच जगताप यांचा सोशल मीडियावरील उत्कृष्ट प्रचार आणि सहानुभूती याचा फायदा जगताप यांना झाल्याचे दिसून आले

शांत संयमी तरुण नाना काटे यांनीही अजित पवार व सुनील शेळके यांच्या नेतृत्वात प्रचारात प्रचंड मुसंडी मारल्याचे दिसून आले, एकवेळ तर नाना काटे विजयी होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, परंतु शिट्टी सर्वच भागात वाजल्याने कलाटे हे काटे यांच्या वाटेतील काटे ठरले असे निकालावरून स्पष्ट झाले,
इकडे चिंचवड वर १८ वर्ष राज्य करणाऱ्या लक्ष्मणभाऊ चा बालेकिल्ला अबाधित  राखण्यात अश्विनी जगताप यांच्या विजयाने भाजपने राखल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *