RPSG गोयंका ग्रुप ने तब्बल ७ हजार ९० कोटीला घेतली नव्या लखनौ संघाची मालकी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२६ ऑक्टोबर २०२१

दुबई


आयपीएलच्या पुढील सत्रात म्हणजेच आयपीएल २०२२ मध्ये दोन नव्या संघांची भर पडणार आहे. काल दुबईमध्ये आगामी हंगामात सामिल होणाऱ्या 2 नव्या संघाच्या मालकी हक्काबद्दल लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात आरपीएसजी ग्रुप आणि सीव्हीसी कॅपिटल यांनी दोन नव्या संघावर आपली मोहर लावली आहे. यावेळी लखनौ आणि अहमदाबाद या दोन संघाची एन्ट्री झाली आहे. या दोन संघासाठी अनेक दिग्गज व्यावसायिक आणि बड्या हस्तींमध्ये बोली लावण्यात आल्या आहेत. यापैकी RPSG अर्थात आरपी संजीव गोएन्का ग्रुप्स आणि सीवीसी कॅपिटल कंपनीने लिलाव जिंकला आहे. गोएन्का ग्रुपने लखनौचा संघ ७ हजार ९० कोटी रुपये तर सीवीसी कॅपिटल कंपनीने अहमदाबाद संघ ५ हजार १६६ कोटींना लिलावात विकत घेतला आहे. दरम्यान आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा संघ लखनऊचा ठरला आहे. तब्बल ७ हजार कोटींच्या घरात किंमत असणाऱ्या या संघाचे मालक असणारे आरपीएसजी ग्रुपचे मालक संजीव गोएन्का यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

गोएन्का ग्रुपने लखनौचा संघ ७ हजार ९० कोटी रुपये तर सीवीसी कॅपिटल कंपनीने अहमदाबाद संघ ५ हजार १६६ कोटींना लिलावात विकत घेतला

ज्याठिकाणी अदानी, मॅंचेस्टर सारख्या कंपन्यांना ५ हजार कोटीच्या पुढे बोली लावता आली नाही. त्याठिकाणी संजीव यांनी तब्बल ७ हजार कोटींच्या घरात संघ विकत घेतला आहे. विशेष म्हणजे याआधीही त्यांनी एका आयपीएल संघाच मालकी हक्क बजावला आहे. कोण आहेत संजीव गोएन्का? संजीव गोएन्का हे भारतीय मल्टीनॅशनल कंपनी असणाऱ्या आरपी संजीव गोएन्का ग्रुपचे संस्थापक मालक आहेत. गोएन्का ग्रुपचं मूळ हेडकॉव्टर कोलकाता येथे असून २०११ साली ही कंपनी उदयास आली आहे. विविध क्षेत्रात गोएन्का ग्रुप असून यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिक युटेलिटी अर्थात वीज पुरवठा कंपनी,रिटेलिंग, आय़टी सर्व्हिसेस, मीडियासह स्पोर्टस आणि शिक्षण अशा क्षेत्रातही गोएन्का ग्रुप पुढे आहे. यात सारेगामा इंडिया लिमिटेड, टू यम, नेचर्स बास्केट, वुडलँड हॉस्पीटल या काही प्रसिद्ध कंपन्या आरपीएसजी ग्रुप अंडर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *