कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात

किरण वाजगे, कार्यकारी संपादक

नारायणगाव

 

येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला.
ग्रामोन्नती मंडळ, नारायणगाव यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्नीत कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाची सुरुवात २००६ साली सुरु केली. आतापर्यंत १३ बॅचेस मधून एकूण ८०० हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन आपापल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहेत. या विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा फायदा महाविद्यालयात सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाशी स्नेह वृद्धींगत व्हावा या हेतूने रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी मेळाव्याचे आयोजन केले.
या स्नेह मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद देत एकूण ४०० विद्यार्थीनी आपला सहभाग नोंदविला.
प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य डॉ.भि.गो.भुजबळ उपस्थीत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी विद्यार्थ्यांना शुभसंदेश दिला. माजी विद्यार्थीनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना पुढील वाटचाली विषयी आश्वस्त केले. या निमित्ताने २००६ साल च्या प्रथम बॅच च्या विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालयास रु.५० हजार देणगी देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्थविक प्राचार्य डॉ.मिलींद भुजबळ यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.किशोर चव्हाण यांनी तर आभार प्रा. सिध्देश पवार यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *