रोटरी क्लब तर्फे नवजात बालकांच्या अतिदक्षतेसाठी नूतन भोसरी रूग्णालयास बेबी वाॅर्मर लोकार्पण सोहळा संपन्न

रोहित खर्गे
विभागीय संपादक
भोसरी दि ७ फेब्रुवारी २०२३

 

रोटरी इंटरनॅशनल ,रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१, रोटरी क्लब ऑफ पुना वेस्ट रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट ममता अंतर्गत चंपाबाई चंदुलाल परमार एज्युकेशनल ट्रस्टच्या व फाॅरेन क्लबच्या सहकार्याने एकूण ११० पैकी ३१ बेबीवाॅर्मरचे लोकार्पण व हस्तांतरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य विभागाकडे ग्लोबल ग्रँड डायरेक्टर रो. संतोष मराठे व सिनर्जी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. चारू श्रोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ. अनिल परमार यांच्या हस्ते करण्यातआले.यापैकी यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयासह त्याअंतर्गत येणाऱ्या ८ हाॅस्पिटलपैकी नुतन भोसरी रूग्णालयात ५ बेबीवाॅर्मरचे लोकार्पण आज रो.अशोककुमार पगारिया, रो.रामदास जैद,मेडिकल सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर रो.प्रदीप गांधी व सेक्रेटरी रो.दीपक सोनवणे यांच्या शुभहस्ते तर नूतन भोसरी रूग्णालयाच्या इन्चार्ज डॉ.ऋतुजा लोखंडे, वरिष्ठ मेडीकल आॅफिसर डॉ.शिवाजी ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
रोटरी क्लबच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयासह इतर ८ ही रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध होत असतानाच याबद्दलची सविस्तर माहिती प्रास्तविकात सेक्रेटरी व उपक्रमाचे समन्वयक रो.दीपक सोनवणे यांनी दिली.
यावेळी बोलताना भोसरी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी ढगे यांनी रोटरी क्लबच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढत या बेबीवाॅर्मरचा नवजात शिशूंना नक्कीच चांगला उपयोग होऊन कित्येक जन्मजात बालकांचे प्राण वाचणार आहे याचे पुण्यही आपल्याला मिळेल असे प्रतिपादन केले.

रोटरी क्लबच्या माध्यमातून सुरू होत असलेल्या या सुविधेमुळे अनेक गरीब गरजू नवजात बालरूग्णांना अगदी उत्तम उपचार देण्याचा आमचा प्रयत्न असेल असा विश्वास भोसरी रूग्णालयाच्या इन्चार्ज डॉ.ऋतुजा लोखंडे यांनी व्यक्त केला.मेडीकल सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर रो.डाॅ.प्रदीप गांधी गेल्या २७ वर्षांपूर्वीपासून भोसरी येथे स्वत: रेडिओलाॅजिस्ट असल्याने गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी निमित्ताने भोसरी रुग्णालयाच्या सर्व डाॅक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत नेहमीच रात्री अपरात्री ही रुग्णांना सहकार्य मिळते असा अनुभव सांगितला व त्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.

रोटरी क्लब आॅफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष रो.रामदास जैद यांनी भोसरी रुग्णालयाच्या माध्यमातून ही सुविधा जास्तीत जास्त नवजात बालकांच्या अतिदक्षतेसाठी होईल तसेच या बेबी वाॅर्मर्सचे योग्य व्यवस्थापन व संवर्धन वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होईल तसेच आरोग्याच्या विविध समाजोपयोगी कार्यात रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी नेहमीच आपल्या पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.प्रा.सचिन पवार यांनी तर आभार रो.केशव काळदाते यांनी मानले.यावेळी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे कार्यकारिणी सदस्य रो. प्राचार्य सदाशिव कांबळे,प्रा.सचिन पवार,आण्णासाहेब मटाले, विजय गोरडे, दत्ताभाऊ कोल्हे, स्वानंद जहागीरदार,संतोष हिंगे, सुनील पाटे पाटील, प्रशांत रासकर, केशव काळदाते, सुरेश टाव्हरे,अमोल भरणे, गोरक्षनाथ गावडे, कुमार लोमटे, दत्तात्रय इंगोले भोसरी नूतन रुग्णालयाचे डॉक्टर सुजाता गायकवाड, स्त्री रोग तज्ञ डॉ. अर्चना गांधी, बालरोगतज्ञ मानसी शहा, वैद्यकीय अधिकारी डॉ.विकल्प भोई, डॉ. सचिन शिनगारे, मॅटर श्रीमती वत्सला वाजे, रंजना कोठावळे, अनुपम वेले व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *