नागरिकांनी कोरोना काळात नियमांचे पालन केले नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊन कडे जावे लागेल. – माई ढोरे महापौर

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी, दि. १६ मार्च २०२१
शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करुन कोरोना नियमांचे उल्लंघन करु नये अन्यथा शहराला लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेऊन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन सहकार्य करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. कोरोना प्रतिबंधक लस शहरातील प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यासाठी महापालिकेने नियोजन करावे अशी सूचनाही महापौर ढोरे यांनी यावेळी महापालिका प्रशासनाला केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सर्वंकष आढावा तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांच्या व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी आयुक्त राजेश पाटील यांच्यासह पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अजित पवार, उल्हास जगताप, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि झोनल रुग्णालयांचे सर्व ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती या बैठकीत घेण्यात आली. शहरातील मुख्य बाजारपेठा, चौक, भाजी मार्केट अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी आढळून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलावीत असा आदेश महापौर ढोरे यांनी प्रशासनाला दिला. भरारी पथकाद्वारे तपासणी मोहिम अधिक गतीमान करावी. नागरिकांना लसीकरणासाठी घरापासून दूर जावे लागणार नाही यासाठी दाट लोकवस्तीच्या भौगोलिक रचनेनुसार लसीकरण केंद्राची उभारण