महिलांसाठी शिवणकला व घरगुती मसाला तसेच केक बनविण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

आंबेगांव प्रतिनीधी –

दिनांक 28 जानेवारी रोजी आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील गंगापूर बुद्रुक गावातील ग्रामपंचायत कार्यालयच्या वतीने महिलांना रुपश्री महिला प्रशिक्षण संस्था जुन्नर या संस्थेमार्फत शिवणकला व मसाला,केक बनविण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता त्या निमित्त श्री हनुमान विद्यालयाच्या प्रागणात प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रशिक्षण संस्थेमार्फत सर्टिफिकेट वाटप शारदा प्रभोधीनी संस्थेचे संस्थांपक पांडुरंगमहाराज येवले यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रशिक्षक संस्थेच्या संचालिका,दोन्ही उपक्रमाच्या प्रशिक्षिका यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनीआपले मनोगत मांडले, उपस्थित प्रशिक्षनार्थी महिला व ग्रामपंचायत सदस्यांनीहि आपले विचार व्यक्त केले, त्यानंतर महिलांनसाठी हळदीकुंकू समारंभ तसेच निवेदक प्रकाशराव बोऱ्हाडे यांच्या हास्य विनोदी शैलीतून साकारलेला खेळ पैठणीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी 5 विजेत्या महिलांना नथ व पैठणी बक्षीसे देण्यात आली व शेवटी हळदीकुंकवाचे वाण देण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत मांडताना शारदा प्रभोधनी संस्थेचे संस्थापक आदरणीय पांडुरंग महाराज येवले यांनी महिलांना या उपक्रमातून घरीच बनविलेला मसाला हा बाहेरच्या भेसळयुक्त मसाल्यापेक्षा आरोग्यासाठी चांगला लाभदायी राहील, शिवणकलेतून आदिवासी भागातील महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्याचा ग्रामपंचायतने पहिल्यांदाच असा उपक्रम राबविला त्याबद्दल सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामसेविका,पेसा अध्यक्ष यांचे मी आभार मानले.
पंचायत समिती बचत गटाच्या समन्वयक सुनीता गेंगजे यांनी सांगितले कि महिलांनी बचत गट स्थापून अशा उपक्रमातून शिक्षण घेतल्यावर आपला व्यवसाय उभारावा, त्यासाठी भांडवल उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईल. यावेळी शिवणकला व मसाला बनविण्याच्या प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिलांनी आपले प्रशिक्षण कालावधीतील अनुभव व प्रशिक्षणाचा काय फायदा झाला ते सांगितले. या कार्यक्रम मध्ये आपले मनोगत व्यक्त करताना ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब आवटे यांनी सांगितले की, आमची ज्यावेळी नवीन सरपंच, उपसरपंच सदस्यांची निवड झाली आणि पहिली मासिक सभा झाली त्यामध्ये ग्रामसेविका सौ. सविता सैद यांनी प्रशिक्षण घेण्याचे सांगितले तेव्हा आम्ही पहिला निर्णय घेतला की महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व स्वयंपूर्ण होण्यासाठी शिवणकला व मसाला बनविण्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे त्यासाठी सर्व सदस्यांनी संमती देऊन हा कार्यक्रम राबविला, यातून गावातील महिलांना स्वयंरोजगार मिळेल व आर्थिक उन्नती होऊन सर्वांगीण विकास होईल. पेसाचे समितीचे अध्यक्ष श्री विकास केदारी यांनीही प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना शुभेच्छा दिल्या. शेवटी आभार मानताना उपसरपंच श्री संदीप येवले यांनी गावच्या विकासासाठी व महिलांच्या विकासासाठी दरवर्षी असे प्रशिक्षणाचे उपक्रम राबविले जातील व या पुढेही प्रशिक्षण कार्यक्रमात महिलांनी या पेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहावे असे बोलून उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना शुभेच्छा दिल्या व आभार मानले , तसेच रुपश्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. अश्विनी नवले व आदिवासी भागात येऊन महिलांना शिवणकला प्रशिक्षण सौ.संगीता बागड व मसाला व केक बनविण्याचे सौ.ऐश्वर्या भागवत यांनी चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण दिले त्याबद्दल त्यांचे व उपस्थित प्रशिक्षण घेतलेल्या महिला व इतर संस्थाचे पदाधिकारी,ग्रामस्थ यांचेही आभार मानले. या सभारंभा निमित्त सरपंच सौ.मंगल चिंतामन केदारी, उपसरपंच श्री.संदीप प्रभाकर येवले, सदस्य सारिका राजेंद्र केदारी,कविता राहुल केदारी, शोभा गणेश लोहोट, सौ. कोमल धनंजय येवले, सौ. निलम दत्तात्रय लोहोट, श्री लक्ष्मण आबाजी कोंढवळ, श्री संतोष महादू भवारी, श्री बाळासाहेब दत्तात्रय आवटे व ग्रामसेविका सौ.सविता बाळासाहेब सैद,ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी श्रीमती सुवर्णा लोहोट, विजय मधे, शरद काळे, रामदास केवाळ यांनी उपस्थित राहून चांगले नियोजन करून कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे संपन्न केला, तसेच यावेळी पेसा समितीचे अध्यक्ष, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व इतर महिला, ग्रामस्थ, इतर संस्थाचे आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे जाहीर केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *