अखिल भारतीय शूटींग बॉल स्पर्धेचे पिंपरी पेंढार जुन्नर येथे आयोजन; दिल्ली, हरयाणा, पंजाब बरोबर महाराष्ट्रातील नामवंत संघाचा सहभाग

रोहित खर्गे
विभागीय संपादक

 

पिंपरी पेंढार :  पिंपरी पेंढार येथील एस. एम. चैतन्य स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे शनिवार दि. २१ व रविवारी दि. २२ जानेवारी २०२३ रोजी निमंत्रित दिवस रात्र अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रासह परराज्यातील राष्ट्रीय संघ सहभागी होणार आहेत, प्रथम क्रमांक रोख २१००० रु आणि चषक द्वितीय १५००० रु चषक तृतीय ९०००रु चषक चतुर्थ ९००० रु चषक पाचवा क्रमांक ६००० रु सातवा क्रमांक ५००० रु आठवा क्रमांक ४००० रु देण्यात येणार आहे. वैयक्तिक बक्षीसेही देण्यात येणार आहेत अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ चव्हाण यांनी दिली.

स्पर्धांचे यंदाचे २१ वे वर्ष असून, केरूशेठ वेठेकर बहुउद्देशीय प्रतिष्ठान, राहुलदादा जाधव युवा मंच व बंटी फूड्स प्रॉडक्ट्स यांच्या प्रायोजनातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. २१) जुन्नरचे आमदार अतुलशेठ बेनके साहेब यांच्या शुभहस्ते होणार असून, यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा “चैतन्य जीवनगौरव पुरस्कारा”ने सन्मान करण्यात येणार आहे.

दिवस-रात्र पद्धतीने खेळविल्या जाणाऱ्या दोन दिवसीय स्पर्धेत प्रथम आठ क्रमांकसाठी ८० हजार रुपयांची रोख परितोषिके व चषक, तसेच वैयक्तिक चषक देण्यात येणार आहेत. मावळचे आमदार सुनिलजी शेळके, पारनेरचे आमदार निलेशजी लंके, अकोलेचे आमदार किरणजी लहामटे , पिंपरी चिंचवड चे माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे, महाराष्ट्र शूटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष मनोहरजी साळवी यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. २२) परितोषिक वितरण समारंभ होणार आहे. स्पर्धेतील सर्व निमंत्रित संघांना प्रवासभाडे देण्यात येणार आहे. तसेच राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९५६१३१३७३७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्ष श्री. चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *