ब्रेक द चेन अंतर्गत लावलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीचा मंचर येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत विस्तृत आढावा घेतला. ब्रेक द चेन अंतर्गत लावलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी, हॉटस्पॉट क्षेत्रातील टेस्टिंग आणि मॅपिंग वाढविणे. तसेच त्या क्षेत्रामध्ये नियंत्रण व निर्बंध लावणे, याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विनापरवाना सामाजिक कार्यक्रम आणि विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

याच बरोबर वळसे पाटील यांनी कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाला गती देणे, पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन देणे आणि उपजिल्हा रुग्णालय मंचर, ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथील अडी-अडचणीसंबंधी सविस्तर चर्चा केली आणि त्यावर उपाययोजना सुचवल्या.

अवसरी खुर्द, शिनोली व लांडेवाडी येतील कोविड केअर सेंटरच्या अडचणी समजून घेतल्या. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि जंबो हॉस्पिटल उभारणीच्या पूर्वतयारीबाबतचाही आढावा घेतला. तसेच म्युकर मायकोसीस या नव्या आजाराचे आव्हान, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी आणि बिलांची तपासणी याबाबतही वळसे-पाटील यांनी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *