महापालिका निवडणूकांना मुहूर्त लागण्याआधीच मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपची जोरदार तयारी

दि. १९/०१/२०२३

पिंपरी

पिंपरी : अनेक महापालिकांची मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासक नेमले गेले आहेत. आता प्रशासकांची सहा महिन्यांची मुदतही पुर्ण झाली आहे. यामुळे बुधवारच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष होते. परंतु यावेळी सुनावणी तीन आठवड्यांनी पुढे ढकलली गेली. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी हे प्रकरण लिस्ट होते पण सुनावणी झाली नव्हती. बुधवारी हे प्रकरण मेन्शन झाले आणि त्यानंतर सुनावणी झाली. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्यात ट्रिपल चाचणीचे संकलन केले जाते. या संदर्भात काही अडचणी आहेत असं महाधिवक्ता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. यामुळे या काळात निवडणुका घेणे योग्य होणार नाही. पुढील तारखेपर्यंत, अंतरिम आदेश राहणार आहे, असे निर्देश देत सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ३ आठवडे सुनावणी लांबणीवर टाकली.

आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात २२ जुलै २०२२ रोजी निर्णय दिला होता. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला परवानगी देण्यात आली होती. पण, त्यानंतर ९२ नगरपरिषदांचा प्रश्न कोर्टात प्रलंबित होता.सर्वोच्य न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात अजून निर्णय होत नाही.

मात्र दुसरीकडे भाजपने मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा निवडणुकीच्या दृष्टीनेच पाहिला जातोय. शिंदे गट आणि भाजप या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा तयारीत आहे. अनेक विकास कामांचे उद्घाटन करुन निवडणुकीच बिगुल वाजणार आहे.असं असलं तरी राज्यातल्या महापालिका निवडणुकांच भवितव्य निश्चित करणारी सुनावणी तीन आठवड्यांनी लांबणीवर पडलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *