पिंपरी चिंचवडमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाला ‘दे धक्का’..

पिंपरी  : निगडीतील सिझन बेंक्वेट हॉल येथे मंगळवारी एका जाहीर कार्यक्रमात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ”बाळासाहेबांची शिवसेना” पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
कामगार नेते आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपनेते इरफ़ान सय्यद यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. कार्यक्रमास माजी खासदार आणि उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिव वाहतूक सेनेचे शहरप्रमुख तेजस ढेरे (शिवसेना ठाकरे गट),अल्पसंख्यांक आघाडी उपशहर प्रमुख (ठाकरे गट) शाकिर शेख, बळीराम सदाशिव जाधव विभाग प्रमुख (ठाकरे गट), उपविभाग प्रमुख रमाकांत उत्तेकर, शाखाप्रमुख सखाराम धाईंजे, नंदू मोरे, गणेश मालुसरे, अशोक पाटील, मनोहर पवार, दिनेश गौर, तसेच युवा सेना (ठाकरे गट) दत्ता आरोळे, गजानन आडे, विकास भोसले, संग्राम कश्यप, अभिषेक तायनात, लक्ष्मण देसाई, अजय निकम, सुनिल सापते, निशांत मान, आकाश जाधव, प्रदिप पाटील, प्रमोद नवले, आनंद जाधव आकाश वर्मा, राहुल गाटे, गोगेश कोरडे, मंगेश गांवकर, पृथ्वीराज कवडे, तथेच मनिषा परांडे, भोसरी विधानसभा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सोनाली बोरशे, उपविभाग प्रमुख दिघी, तसेच शाखा प्रमुख मिनिक वाघमारे, पुष्पा नवनाळे, श्रीधर खानापूर, अंजली सुर्वसे, रेणुका काळे, गायत्री देवे, डॉ. माळी भूषण तसेच भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हा सदस्य रोहित जगताप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग प्रमुख (चिंचवड) आशिष चव्हाण, सामाजिक कार्यकर्त सागर राउत, भूषण काळे, नुरभाई शेख, हैदर शेख-शाखाप्रमुख, राजू शेख, इरफान पठाण, गंगाल चौधरी, सुनिल पवार, विभागप्रमुख, युवासेना, महिला आघाडी आणि शेकडो शिव सैनिकांनी, तसेच विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश  केला.
यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले,  ”मुख्यमंत्री आमचे असले तरी सरकार अजून कुणीतरी चालवतोय. तिजोरीच्या चाव्या जरी आमच्याकडे असल्या तरी खर्च करण्याची अ‍ॅथोरीटी अजून कुणाकडे आहे, याची जाणीव झाली होती. शिवसैनिकांची घुसमट होत होती. बाहेर पडलो तर, खोके सरकार, मिंधे सरकार, गद्दार, असे आमच्यावर आरोप केले गेले. ज्याप्रमाणे जुगारात हरलेला माणूस वाटेल तसा बडबडतो तशी परिस्थिती काही लोकांची झाली होती. त्या लोकांच्या मनात असे विचार का आले? ५५ पैकी ४० लोक बाहेर पडतात, असे कसे झाले? राजा आंधळा होतो, तेव्हा प्रधानालाच सत्तेची सूत्रे हाती घ्यावी लागतात. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे आपले प्रधान आहेत. त्यांच्या साथीला साथ देत आपल्याला पुढील येणारी अनेक वर्षे त्यांची ढाल बनून बाळासाहेबांचे विचार अमर करायचे आहेत, त्यासाठी पुन्हा एकदा उठा, संघर्ष करा एकत्रित व्हा.
कार्यक्रमास शिरूरचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, मावळचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर प्रमुख निलेश तरस, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, जिल्हा संघटिका शैलाजी पाचपुते, शहर संघटक सरिता साने, उपजिल्हाप्रमुख संभाजी शिरसाठ, युवा जिल्हा अधिकारी धनंजय पठारे, जिल्हा संघटक अशोक भुजबळ, तालुकाप्रमुख अरुण गिरे, भोसरी विधानसभा प्रमुख दत्तात्रय भालेराव, पिंपरी विधानसभा प्रमुख रुपेश कदम, चिंचवड विधानसभा प्रमुख सुरेश राक्षे, महिला भोसरी विधानसभा प्रमुख मनिषा परांडे, पिंपरी विधानसभा प्रमुख शैला निकम, चिंचवड विधानसभा प्रमुख शारदा वाघमोड़े,जिल्हा संघटक निलेश पवार, पक्षाचे पदाधिकारी, सर्व महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, पक्षाच्या सर्व अंगीकृत संघटना आणि समस्त शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *