माझ्या नादी लागले तर सोडणार नाही अंजली दमानिया यांचा एकनाथ खडसे यांना पत्रकार परिषदेत इशारा

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

मुंबई, दि 22 ऑक्टोबर
अंजली दमानिया यांचा खडेसे वर आरोप त्या बोलताना म्हणाल्या खडसे खुनशी प्रवृत्तीचे आहेत.

खडसे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याविषयी अत्यंत खालच्या दर्जाचे बोलले होते. त्याचा व्हिडीओ माझ्याकडे आला तेव्हा माझा संताप अनावर झाला. त्यानंतर मी वाकोला पोलीस स्टेशन ला जाऊन 509 अंतर्गत मी FIR नोंदवली. खडसेंनी माझ्या विरोधात अश्लील वक्तव्य केले. त्या वेक्तीला धडा शिकवलाच पाहिजे असे ठरवले. आशा नेत्यांना कोण ताकद देते .

यामागे फडणवीसांनी ही राजकारण केले, मी केलेल्या तक्रारींवर कोणतीही कारवाई केली नाही. अमृता फडणवीस असत्या तर असे बोलले असते का. खडसेंनी कोणत्याही पक्षाचे जावो पण पत्रकार परिषेदेत परत परत माझे नाव घेतले तर माझ्याहून वाईट कोण्ही नाही. यांच्या सारखा भरष्टाचारी माणूस कोण्ही नाही. यापुढे माझे नाव घेतले तर मी बिलकुल सोडणार नाही. 509 चा खटला अजून संपलेला नाही खडसे चक्क खोटे बोलले. 10 जिल्ह्यामध्ये माझ्या विरुद्ध केलेल्या या केसेस आहेत. मी इतकी खंबीर आहे की सगळीकडे गेले दुसरे सर्वसामान्य कोण्ही असते तर त्यांना शक्य नव्हते.