गुरुवारी पुण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद रहणार

दि. १७/०१/२०२३

पुणे

 

पुणे : गुरुवार १९ जानेवारी रोजी पुणे महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एलएलआर टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र परिसर, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर, एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) परिसर व चतु:शृंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर तसेच कोंढवे – धावडे जलकेंद्र येथील विद्युत, पंपिंग व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे या पंपिंगस्टेशनच्या अखत्यारीतील भागात गुरुवारी पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.तसेच शुक्रवार दिनांक २० जानेवारी  रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती MLR टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती HLR टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.

पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.
लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग :- संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क,रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर.

नवीन व जुने होळकर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग:- मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर, MES, “HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
भामा आसखेड जलकेंद्र परिसर :- लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा,कळस, धानोरी, इत्यादी

वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर :- पाषाण साठवण टाकी, भूगाव परिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, आदी

गांधी भवन टाकी परिसर :- कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी. एस. यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.

पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :- बाणेर, बालेवाडी, बाणेर गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड, विजयनगर, आंबेडकरनगर, दत्तेनगर आदी

वारजे जलकेंद्र लगत GSR टाकी परिसरः- कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम सोसायटी, शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र. १ ते १०

एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) व चतुश्रुंगी टाकी परिसर :- गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापिठ, लॉ कॉलेज रोड,महाबळेश्वर हॉटेल पर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलनी भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, चतुश्रृंगी टाकीवरुन पाणीपुरवठा होणारा बाधीत भाग, पौड रोड शीला विहार कॉलनी, अद्वैत सोसा. भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पध्दतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसा. विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बीग बाझार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयुर कॉलनी परिसर, मयुर डी. पी. रस्त्याची डावी बाजु, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्या पर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एच. ए. कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टैंकर पॉईट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल, हिमाली सोसायटी, वकिलनगर इत्यादी, करिष्मा सोसा., ते वारजेवार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनिषा, स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती, सविता सोसा, विठ्ठल मंदिर रस्त्यापर्यंत, म्हाडा कॉलनी, नेहरूनगर वसाहत, पाळंदे कुरियर, राहुलनगर, प्रीतमनगर आदी.

एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) टाकी परिसर :- गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी ,गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडीे, कोपरे.

कोंढवे – धावडे जलकेंद्र :- वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे

वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *