शब्द शंकरपाळी साहित्य समूहाच्या लोगोचे प्रकाशन उत्साहात साजरे..

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि. २८ जून २०२१(ओझर) :मराठी साहित्य क्षेत्रातील मुंबईतील शब्द शंकरपाळी साहित्य समूह यांच्या लोगोचे (बोध चिन्हाचे) नुकतेच ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. समूहाचे संस्थापक माननीय श्री.भूषण सहदेव तांबे यांनी तसे सर्वांसमक्ष ऑनलाईन जाहीर केले.

या अप्रतिम लोगोसोबत समूह संस्थापक माननीय श्री.भूषण सहदेव तांबे यांनी एक स्लोगन (घोष वाक्य) सुध्दा जाहीर केले. “शब्दालंकाराचे कौशल्य” असे हे एकमेव आणि आकर्षक स्लोगन (घोष वाक्य) या लोगोला देण्यात आले. या लोगोचा सर्वच ठिकाणी उपयोग केला जाणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील सर्व साहित्यिक या लोगोचे प्रकाशन होण्यास फार उत्सुक होते. प्रकाशन होताच या लोगोचे सर्व स्तरावरून खूप कौतुक करण्यात येत आहे. शब्द शंकरपाळीसाठी मिळालेली ही नवी ओळख त्याचे नावलौकिक अजून उच्च स्तरावर नेईल यात कोणतीच शंका नसेल अशी आशा समूह संस्थापक यांनी व्यक्त केली आहे.

Advertise

या लोगोचे निर्माते श्री. विघ्नेश पाष्टे, रत्नागिरी यांनी केले तर स्लोगन (घोष वाक्य) श्री.भूषण सहदेव तांबे यांनी केले. या दोनीही कार्याला मोलाचे सहकार्य लाभले ते म्हणजे सौं. अवंतिका महाडिक, यांच्या पुढाकाराने आणि नेतृत्वाने हे कार्य यशस्वी होण्यास फार मोठे सहकार्य लाभले. असे समूह संस्थापक आणि शब्द शंकरपाळी काव्यप्रकाराचे निर्माते श्री.भूषण सहदेव तांबे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *