मुख्यमंत्री शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर नारायण राणेंची टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवाबद्दल केलेल्या विधानावरुन टीका केली आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करतटीका केली आहे. दसरा मेळाव्यातील भाषणामधील अनेक मुद्द्यांवरुन राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. याचवेळी त्यांनी शिंदेंचा दीड वर्षांचा नातू रुद्रांक्ष आणि मुलगा श्रीकांतबद्दल विधान केलं. या विधानावरुन नारायण राणेंनी राणेंनीही उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे.

बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या, असा उल्लेख उद्धव यांनी आपल्या भाषणात केला. यावर नारायण राणेंनी टीका केली आहे. अरे दीड वर्षांचा नातू ना तो. लाज नाही वाटली बोलायला. तो कुणाचा मुलगा आहे, दीड वर्षाचा आहे याचा विचार नाही केला. उद्या तो नगरसेवक झाला तर त्याच्या बापाने आणि आजोबाने मेहनत घेतली म्हणून होईल, असं राणे संतापून म्हणाले. उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा एकेरी उल्लेख करत, “याने काय घेतलीय मेहनत? हा फक्त रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि पाटणकर एवढ्यांमध्येच. पाटणकर काही न करता मालक. तुला एकाही शिवसैनिकाची आठवण का झाली नाही? कुठल्या सैनिकाला मदत केली का? मराठी माणसासाठी काय योगदान दिलं? असे असे प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *