तमाशाप्रधान चित्रपटातून गौतमी पाटील पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

दि. १६/०१/२०२३

किरण वाजगे

नारायणगाव

 

संदीप डांगे दिग्दर्शित घुंगरू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नारायणगाव : सध्या सर्वत्र गाजत असलेली नृत्यांगना गौतमी पाटील पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर “घुंगरू” या तमाशाप्रधान मराठी चित्रपटातून झळकणार आहे.

इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसअप तसेच यूट्यूब आदी सोशल मीडियाच्या अनेक साइट्सवर प्रचंड प्रसिद्ध असलेल्या सध्याची आघाडीची नृत्यांगना गौतमी पाटील आता वेगळ्या शैलीमध्ये आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

महाराष्ट्रात गाजत असलेल्या चिंतामणी सिने क्रीएशन निर्मित अभिनेता व निर्माता बाबा गायकवाड यांचा तमाशा कलावंतांचा जीवनपट मांडणारा घुंगरू चित्रपट सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब. माढा तसेच कर्नाटक. हंपी, गोवा. इंदापूर, बारामती व थायलंड येथे चित्रीकरण झाले असून आता घुंगरू चित्रपटाची टीम उटी म्हैसूर येथे चित्रीकरणासाठी जाणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईला आपल्या हटके नृत्यशैलीमुळे भुरळ घालणाऱ्या व सातत्याने वादात अडकणाऱ्या आणि अल्पावधीत प्रकाश झोतात आलेल्या गौतमी पाटील हिची घुंगरू या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.

“बाळू मामाच्या नावाने चांगभले” या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते बाबा गायकवाड यांच्या बरोबर ती पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेते संदीप डांगे यांनी केले असून छायाचित्रण रवी लोकरे यांनी केले आहे.

घुंगरू या चित्रपटात प्रशांत तोतला, अजित केंद्रे. साक्षी गायकवाड, रोशनी कदम, शीतल गीते. श्री ढाकणे, श्रीमंत ढाकणे, रणजित जाधव, अशोक खरात, सुदाम केंद्रे. उषा चव्हाण. पायल राजगुरू, रणजित जाधव, वैभव गोरे, महेश सावंत, दत्ता तोरणे, अर्जुन कांबळे, सुमित मेरगळ व किरण वाजगे यांनी भूमिका साकारली आहे. गणेश खंडागळे या चित्रपटात प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत.

हा चित्रपट एप्रिल महिन्यात आपल्या जवळच्या चित्रपगृहात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *