ओझरकर ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांना एक हात मदतीचा , जीवनावश्यक वस्तू व किराणा साहित्याची केली मदत…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि. १ ऑगस्ट २०२१( ओझर): अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने नागरी वस्तीत व नगरांमध्ये पुराचे पाणी शिरून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेल्या गावांना मदत म्हणून श्री क्षेत्र ओझर येथील ग्रामस्थांनी मदतीचा एक हात देत गृहोपयोगी साहित्य ,किराणा व खाद्यपदार्थ पूरग्रस्तांना मदतीच्या स्वरूपात दिले आहेत.

ओझर मधील तरुणांनी एकत्र येऊन ग्रामस्थांना पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केल्यानंतर ज्याला जसं शक्य होईल त्याप्रमाणे येथील ग्रामस्थांनी पैसे एकत्र करून साहित्य खरेदी केले. यामध्ये किराणा किटमध्ये साखर ,रवा ,बेसन पीठ, गहू आटा, तेल, पोहे ,तांदूळ ,मीठ ,मिरची हळद, धना पावडर ,साबण, कोलगेट ब्रश, बिस्कीटे अशा जीवनावश्यक वस्तूंचा यामध्ये समावेश आहेत. ओझर गावातील तरुणांच्या आव्हानाला प्रतिसाद देत ओझरकर ग्रामस्थांनी रायगड जिल्ह्यातील चीपळून या गावातील पूरग्रस्तांना या ठिकाणी एक प्रकारे मदतीच्या स्वरुपात मदत केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *