शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ नोव्हेंबर २०२१

पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहचवणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचा मृत्यूशी संघर्ष संपला. बाबासाहेबांचा जन्म पुण्यात २९ जुलै १९२२ रोजी पुण्यात झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहत बाबासाहेब हे त्यांच्या विपुल कार्यामुळे आपल्यात जिवंत आहेत. बाबासाहेब आपल्यात नसणार हीच मोठी पोकळी आहे बाबासाहेब हे महान विभूती होते असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी आपल्या भावना वेक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष शरद पवार यांनी भावना वेक्त करत बाबासाहेबांनी छत्रपती शिवरायांचे चरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले असे म्हणत आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनही श्रद्धांजली. नामदार नितीन गडकरी यांच्यासह देशातील अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली . माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य महाराजांच्या चरणी अर्पण केले होते. असे वाटले होते की अजूनही त्यांचे सान्निध्य आपल्याला लाभनार होते, पण ते अपल्यातून निघून गेले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

” जानता राजा ” या महानाट्यातून जनसामान्यांपर्यंत बाबासाहेब पोहोचले होते. त्यांच्या जाण्याने जी मोठी पोकळी निर्माण झाली ती न भरून निघणारी आहे. पुण्यातील पुरंदरे वाड्यात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून महाराष्ट्रातून असंख्य चाहते त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहचले आहेत. सकाळी १०.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. ते साहित्यिक, निर्माते, दिग्दर्शक अभिनेते आणि गडकिल्ले संवर्धक होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व बाबासाहेबांचे एक वेगळे अतूट नाते होते ते नेहमी पुण्यात आलेवर बाबासाहेबांना भेटून तब्बेतीची विचारपूस करून जात असे. नुकताच २९ जुलै रोजी कार्यक्रम झाला त्यात राज ठाकरे भरभरून बोलले होते. आज त्यांना ही दुःखद बातमी समजल्यावर अंतिम दर्शनासाठी मुंबईतून पहाटे निघून पुण्यात पर्वती येथील पुरंदरे वाड्यावर पोहचले व बाबसहबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. छत्रपती उदयनराजे भोसले त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार असल्याचेही सूत्रांकडून समजते.

बाबासाहेब त्यांच्या विपुल कार्यामुळे जिवंत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी

बाबासाहेब हे त्यांच्या व्याख्यानातून जे मानधन मिळत असे ते सर्व मानधन ते समाजकार्यासाठी वापरत असे. त्यांनी पुण्यात शिवसृष्टी उभारण्याचे काम हाती घेतले ते काम सध्या प्रगतीपथावर आहे. बाबासाहेब पुरंदरे हे निसर्गप्रेमी व पर्यावरणवादी होते त्यांनी अनेक झाडे लावून पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी खारीचा वाटा उचलला. २९ जुलै ला त्यांची जन्म शताब्दी नुकतीच झाली होती. बाबासाहेब नेहमी लहनांनबरोबरही आदराने बोलत असे. त्यांची वयाच्या १०० री मध्येही उत्तम स्मरणशक्ती अतिशय दांडगी होती. त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी रांग लागलेली आहे. थोड्याच वेळात त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

आपला आवाज न्यूज नेटवर्क च्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *