अखेर ! मनातली घुसमट आली समोर; लवकरच काँग्रेस आघाडीतून बाहेर पडणार ?

दि. १२/०१/२०२३
पिंपरी

पिंपरी : काँग्रेसची महाविकास आघाडीत कोंडी झाली हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवू असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होत. 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत आहेत, असं पवार म्हणाले होते.

पण आता नाना पटोले यांनी पुन्हा स्वबळाची भाषा करत आम्ही जनतेच्या अपेक्षेत खरे उतरु आणि स्वबळावर निवडून येऊ असं वक्तव्य केलं आहे. पटोले यांच्या या विधानामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मराठवाडा, विदर्भासह कोकणामध्येही काँग्रेसचा आमदार निवडून येऊ शकतो, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

पवारांसारखे जे काँग्रेस सोडून गेले त्यांनाही आता काँग्रेस संपणार नाही, असं वाटत आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. काँग्रेस स्वबळावर निवडून येईल अस विधान नाना पटोले यांनी अनेकदा केलेल आहे. काँग्रेस लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशा चर्चांना उधाण आलय. नाना पटोले यांच्या विधानावर आता शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेतेमंडळी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *