जनसंवाद सभेत ८२ नागरिकांच्या तक्रारी

दि. ९/१/२०२३
पिंपरी


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज सोमवारी पार पडलेल्या जनसंवाद सभेत ८२ नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या तक्रारी मांडल्या.

यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे २०, ७, २, ६, १०, ११, ११ आणि १५ नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.
नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, पथारीवाल्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, खराब झालेल्या ड्रेनेज लाईन दुरुस्त कराव्यात, रस्त्यांवरील बेवारस वाहने तसेच अनेक दिवसांपासून रस्त्यावर उभी असलेली वाहने जप्त करण्यात यावीत, शहर परिसरात वेळोवेळी किटकनाशक फवारणी करण्यात यावी, अनधिकृत बांधकामांवर प्रतिबंध व निष्कासनाची कारवाई करावी अशा तक्रारींचा समावेश आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *