प्लॅस्टिकमुक्त तीर्थक्षेत्र अभियानाचा जुन्नर येथे प्रारंभ

दि. ०५/०१/२०२३
जुन्नर


जुन्नर : तहसील कार्यालय जुन्नर येथे बुधवार ४ जानेवारी रोजी श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट गोळेगाव, जुन्नर नगरपरिषद जुन्नर , रुद्रा ब्लु प्लॅनेट इन्व्हाँयर्नमेंटल सोल्युशन इंडिया लिमिटेड व केशव सीता मेमोरियल फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टिकमुक्त तीर्थक्षेत्र अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या लेण्याद्रीला भेट देण्यासाठी असंख्य भाविक व पर्यटक येत असतात या ठिकाणच्या प्लॅस्टिकचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करून पुण्यातील प्लॅस्टिक विघटन करणारी रुद्रा ब्ल्यू प्लॅनेट इन्व्हाँयर्नमेंटल इंडिया लिमिटेड व केशव सीता मेमोरियल फाउंडेशन ट्रस्ट या संस्थांना दिले जाणार आहे. त्याचा वापर इंधन तसेच रस्ते बनवण्यासाठी होणार आहे.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी ,जुन्नर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे ,आरोग्य विभागाचे प्रशांत खत्री श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई ,उपाध्यक्ष संजय ढेकणे, सचिव शंकर ताम्हाणे , खजिनदार काशिनाथ लोखंडे, विश्वस्त जयवंत डोके, भगवान हांडे, आदी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *