लायन्स क्लब भोजापूर गोल्ड च्या अध्यक्षपदी ला. सुरेखा विलास साबळे यांची निवड…जनसामान्यांसाठी कृतीशील कार्य करण्याचा केला निर्धार!

रोहित खर्गे
विभागीय संपादक

भोसरी- दि ३ ऑगष्ट २०२१
लायन्स क्लब भोजापूर गोल्ड चा पदग्रहण सोहळा ‘ रागा पेलेस ‘ काळेवाडी येथे संपन्न झाला. अध्यात्म, साहित्य, वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेला हा पिंपरी चिंचवड मधील अग्रणी क्लब आहे.
अनेक मोठी साहित्य संमेलने, शिक्षक प्रतिभा साहित्य संमेलन भरवण्यात या क्लब चा सतत सहभाग असतो. गरजु गरीब व अनाथ मुलांना शैक्षणिक मदत,सेवाभावी वृत्ती जोपासीत सातत्याने आरोग्यविषयक शिबिरे घेत असतो.
या पदग्रहण सोहळ्यात लायन्स डिस्ट्रिक्ट 3234D2 उपप्रांतपाल एमजेफ लायन राजेश जी कोठावदे यांनी सेवावर्ष 2021-22 च्या पदाधिकाऱ्यांना पद व अधिकारप्रदान करण्याची शपथ दिली. यावेळी अध्यक्ष ला. सुरेखा विलास साबळे, सेक्रेटरी ला. जयश्री मुरलीधर साठे व खजिनदार म्हणून डॉ दीपाली अभिजित कुलकर्णी यांची तर उपाध्यक्ष म्हणून डॉ शंकर गायकवाड यांनी शपथ घेतली. या कार्यक्रमास प्रसिध्द व्याख्याते प्रा. दि बा बागुल मुख्य अतिथि होते. यावेळी रिजन चेअरमन राजश्री शहा तर झोन चेअरमन ला. बी के शर्मा उपस्थित होते.
नुतन अध्यक्षा ला. सुरेखा साबळे यांनी त्यांच्या सेवावर्षात क्लबच्या नेहमीच्या कामासोबतच ऑर्गन डोनेशन साठी भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अध्यक्षांच्या सेवाकार्याची सुरवात म्हणून बीड मधील शेतमजुराचा मुलगा चिं. सतिश पाटोळे या विद्यार्थ्याला फर्गुसन महाविद्यालयातील त्याच्या तीन वर्षाच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च व त्याच्या UPSC /MPSC च्या शिक्षणाची फी म्हणून दिड लाख रुपयाची मदत क्लब चे ज्येष्ठ सदस्य डॉ रोहीदास व माधुरी आल्हाट यांनी केली. तसेच आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी दत्तक योजनेंतर्गत त्यांना अभ्यासासाठी नवीन मोबाईल व रोख 10000 रुपये मदत प्रदान केली. त्याचप्रमाणे अत्यंत गरीब कर्णबधीर मुलाला व्हाईस मशीन घेण्यासाठी रुपये 5000 रोख प्रदान करण्यात आले. कोरोना काळात मृत पालकांच्या दोन गरीब मुलींना शैक्षणिक मदत, तळवडे येथील अनाथ आश्रमाला डॉ अनु गायकवाड यांच्या पाच एकर शेतीतील पूर्ण उत्पन्न देण्याचा संकल्प केला. ब्रेन डेड पेशंटचे ऑर्गन डोनेशन करणाऱ्या दोन मातापित्यांचा सन्मान करून सेवाकार्याची सुरुवात केली.
मावळते अध्यक्ष ला. अरुण इंगळे यांनी आपल्या सन 20-21 च्या सेवाकार्याचा आढावा सादर करताना क्लबने केलेल्या उत्तुंग कामाचा लेखाजोखा मांडला. यावेळी ला.अरुण इंगळे म्हणाले- लायन्स क्लब भोजापुरचे ज्येष्ठ सदस्य ला. मुरलीधर साठे रिजन चेअरमन यांनी सतत केलेल्या मार्गदर्शनामुळे सदस्यांना काम करण्याची उर्जा आणि प्रेरणा मिळाली. क्लब च्या संचालक मंडळावर निवड झालेले डॉ विलास साबळे, पुरुषोत्तम सदाफुले, डॉ अनु गायकवाड ,मुकुंद आवटे ,प्रा शंकर देवरे, चंद्रकांत सोनटक्के, परशुराम आल्हाट आणि नागेश वसतकर यांनी नवीन टीम ला सर्व प्रकारचे सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे वचन दिले.
पदग्रहन सोहळा समिती प्रमुख ला. डॉ. प्रशांत गदिया यांनी अतिशय नेटका कार्यक्रम आयोजित केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले तर आभार डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *