एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ जखमेवरील खपली काढली

दि. ०५/०१/२०२३
मुंबई


मुंबई : शिवसेनेचे दोन तुकडे होण्याआधी ज्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा यशस्वी केला. आता त्याच पदाधिकाऱ्यांकडे एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी आली आहे. शिवसेना फुटीनंतर ठाकरेंचा अयोध्या दौरा यशस्वी केलेल्या नाशिकच्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वी अयोध्या येथील काही महंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना अयोध्या येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते स्वीकारले. त्याच दरम्यान नाशिकचे पदाधिकारी असलेले ज्यांनी या आधी दोन ते तीन वेळा झालेल्या ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले आहे ते भाऊसाहेब चौधरी आणि अजय बोरस्ते हे उपस्थित होते.शिवसेनेकडून ज्या ज्या वेळेस अयोध्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले त्या त्या वेळी नाशिकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाण्यायेण्याची व्यवस्था केली होती.

त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी असणार आहे.नाशिकच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर अयोध्या दौऱ्याची जबाबदारी देऊन शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या दुःखावरच्या खपल्या काढल्याच बोलल जाऊ लागल आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *