खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा;  ‘पिंपरी-चिंचवड श्री 2022’चा भरत चव्हाण मानकरी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे विभागीय शरीर सौष्ठव संघटना, पुणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि पुणे हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत भरत चव्हाण याने ‘पिंपरी-चिंचवड श्री 2022’चा  किताब पटकाविला. 80 किलो वजन गटामध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकाविला.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये ही स्पर्धा पार पडली.  सिनेअभिनेते तुषार कपूर,अभिनेते निकीतीन धीर, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते  ‘पिंपरी-चिंचवड श्री 2022’चा मानकरी भरत चव्हाण याला सन्मानचिन्ह देण्यात आले. बेस्ट पोझसाठी सौरभ होरवे तर बेस्ट इम्प्रुव्हमध्ये जयेश गोरे यांना गौरविण्यात आले. बक्षीसाची रोख रक्कम देण्यात आली. तर, प्रत्येक गटातील 1 ते 6 क्रमांच्या  शरीरसौष्ठवपटूला प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात आले.

पिंपरी-चिंचवड शहर युवा अधिकारी विश्वजित बारणे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, रूपेश कदम, धनाजी बारणे, बशीर सुतार, बाळासाहेब वाघमोडे, रवी नामदे, प्रमोद नणवरे, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते. सुनिल पाथरमल यांनी जिल्हास्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा वजन गट 55, 60, 65, 70, 75, 80 आणि 80 किलोवरील गटात झाली.  विविध प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत 135 शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”या स्पर्धेत मोठ्या संख्येने शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. गेल्या 13 वर्षांपासून शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले जाते. तरुणांमध्ये पिळदार शरीर करण्याची ‘क्रेझ’ आहे. शहरात जीमची संख्या वाढत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शरीरसौष्ठवपटूला प्रोत्साहन मिळाले. शरीरसौष्ठवपटूंनी पिळदार शरीराचे सादरीकरण केले”.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *