भिमआर्मीतर्फे कारेगावमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

दि. ०४/०१/२०२३
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर


शिरूर : शिरूर तालुक्यातील मौजे कारेगाव येथे मंगळवारी, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भिमआर्मी भारत एकता मिशन संघटनेतर्फे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात करण्यात आले.

यावेळी संघटनेचे कारेगाव अध्यक्ष मनोज जगताप, कार्याध्यक्ष प्रसाद जगताप, श्रीगोंदा अध्यक्ष सूर्यकांत धामणे, अविनाश नवले (शहरप्रमुख युवासेना), सोमनाथ (बंटी) नवले (युवासेना शिरूर तालुका अध्यक्ष), सामाजिक कार्यकर्ते ओम जाधव, विनोद जगताप, स्वप्निल गवारे, किरण गवारे, योगेश नवले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शाळेतील शिक्षक उपस्थित होते.

भिमआर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद, राष्ट्रीय अध्यक्ष विनय सिंग तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका प्रभारी संदीप शेलार यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *