शिरूर येथील विठ्ठलनगर मधील ध्यानमंदिरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर


शिरूर : शिरूर शहरात विठ्ठलनगर येथील ध्यानमंदीरात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त, ‘सावित्रीच्या लेकींच्या’ हस्ते अभिवादनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस शोभना पाचंगे, शिरुर तालुका महिला अध्यक्षा उर्मिला फलके, शहराध्यक्षा साधना शितोळे, कार्याध्यक्षा भारती बारवकर, महिला संघटक ज्योती हांडे, संघटक आशा ढवण, विजया टेमगिरे, नगरसेविका रोहिणी बनकर, तालुकाध्यक्ष शामकांत वर्पे, शहराध्यक्ष रावसाहेब चक्रे, सबरजिस्टार अनंत भुजबळ, माधवसेनेचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र सानप, माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण भुकन, माजी मुख्याध्यापक गाडेकर, आध्यात्मीक आघाडीचे बाळू महाराज जोशी, बांधकाम व्यावसायिक शेखर दळवी व इतर अनेक पदाधिकारी अभिवादनासाठी उपस्थित होते.

यावेळी साधना शितोळे, शोभना पाचंगे, रोहिणी बनकर, रविंद्र सानप व बाळू महाराज जोशी यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिठू गदादे यांनी केले. तर आभार किरण बनकर यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *