जुन्नर तालुक्यातील ४७ कर्तृत्ववान व्यक्तींना सह्याद्री व्हॅली यशप्राप्ती पुरस्कार; शनिवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा

दि. ०४/०१/२०२३
जुन्नर


जुन्नर : जुन्नर तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सह्याद्री व्हॅली यशप्राप्ती पुरस्कार २०२२ देऊन करण्याचे मुंबईतील पीपल्स आर्ट सेंटर या संस्थेने ठरविले आहे. शनिवार ७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ओझर येथील विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे हा सोहळा होणार आहे.

या सोहळ्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, जेष्ठ संगणक तज्ञ व लेखक डॉ. दिपक शिकारपूरकर व जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते सर्व पुरस्कारार्थींचा सन्मान केला जाणार आहे.

पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये १) खासदार डॉ. अमोल कोल्हे, २) कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, ३) श्री. बाळासाहेब काकडे, ४) श्री. जितेंद्र महादेव गुंजाळ, ५) श्री. विनय बडेरा, ६) श्री. भाऊसाहेब काशिद, ७) श्री. गणेश कवडे, ८) डॉ. सदानंद राऊत, ९) श्री. सत्यशील शेरकर, १०) श्रीमती मंगल दाते, ११) श्री. शिवाजी चाळक, १२) श्री. विनायक खोत, १३) श्री. विकास चव्हाण, १४) डॉ. जे. आर. मुल्ला, १५) श्री. रमेश डुंबरे, १६) श्री. बाळासाहेब जाधव, १७) डॉ. रामदास डामसे, १८) श्री. शिरीष भोर, १९) श्री. अरविंद ब्रम्हे, २०) श्री. बापूजी ताम्हाणे, २१) प्रा. रतिलाल बाबेल, २२) श्री. अतुलसिंह परदेशी, २३) श्री. भरत अवचट,
२४) श्री. उत्तम सदाकाळ, २५) श्री. जितेंद्र बिडवई, २६) श्री. नितीन पाटील, २७) श्री. प्रकाश वेठेकर, २८) श्री. रमेश खरमाळे, २९) श्री. डॉ. अमित काशिद,
३०) श्री. जितेंद्र देशमुख , ३१) श्री. विठ्ठल शितोळे, ३२) श्री. संतोष वाळेकर, ३३) श्री. बाळासाहेब ढमाले, ३४) श्री. शंकर कचरे, ३५) श्रीमती सुलोचना नलावडे
३६) श्रीमती सुंदरताई कुरहाडे, ३७) कु. शौर्य काकडे, ३८) श्री. मुरलीधर गुंजाळ, ३९) श्री. देविदास तांबे, ४० ) श्री. चिमण वायाळ, ४१) श्री. विश्वास धोंडकर,
४२) श्री. संजय नलावडे, ४३ ) श्री. मारुती बोरचटे, ४४) श्री. सावळेराम पाडेकर, ४५) श्री. काशिनाथ आल्हाट, ४६) श्री. किशोर दांगट, ४७) सुनील गोसावी या मान्यवरांचा समावेश आहे.

जुन्नरसारख्या अष्टविनायक आणि शिवजन्मभूमीमुळे परम पावन बनलेल्या भूमीतील या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण संस्थेचे सचिव श्री. गोपकुमार पिल्ले (संपर्क क्र. 9561795704) व संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. राजेश जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *