राजीनामा घेऊच तोही व्याजासहित; अमोल मिटकरी यांचं ट्विट

२७ डिसेंबर २०२२


नेहमी कोणत्या-कोणत्या कारणांनी चर्चेत राहणारे अब्दुल सत्तार पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावरून चर्चेत आले आहे.शिंदे-भाजप सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सत्तार यांनी वाशिमच्या घोड बाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं एका व्यक्तीला अनधिकृत रित्या वाटप केल्याचा आरोप आहे. यावरून विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. ‘राजीनामा घेऊच तोही व्याजासहित..,’ असं मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिउत्तर दिले आहे की, माझ्यावर झालेले आरोप सभागृहात झाले असल्याने याला उत्तर देखील सभागृहातच देणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *