कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते “कवींचे कॅलेंडर -२०२३” चे व “ह्रदयाचे न बोलणारे ठोके” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

दि. ०२/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : भोसरीतील ‘नक्षत्रांच देणं’ काव्यमंचाने प्रकाशित केलेल्या “कवींचे कॅलेंडर -२०२३” आणि “ह्रदयाचे न बोलणारे ठोके” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्योगपती कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते नुकतेच झाले.पैस रंगमंच,थिएटर वर्कशाॅप कंपनी,चिंचवड,पुणे येथे रविवारी हा कार्यक्रम झाला.

यावेळी कृष्णकुमार गोयल म्हणाले,”नक्षत्राचं देणं काव्यमंचने गेलया २३ वर्षांपासून जो कवितेचा यज्ञ पेटत ठेवला आहे.त्यातून अनेक दर्जेदार कवी तयार झाले.अनेकांना या संस्थेने हक्काचे व्यासपीठ निर्माण करुन दिले आहे. संस्थेचा प्रगतीचा आलेख उंचावत आहे.मी त्याचा साक्षीदार आहे.कवितेने स्पर्श केलेला माणूस हा सदैव चैतन्याचा झरा बनत असतो.आज माझ्या हस्ते प्रकाशित झालेले कॅलेंडर व काव्यसंग्रह अतिशय सुंदर, दर्जेदार आहेत .संस्थेला माझी सदैव साथ राहील.”

यावेळी कवी दिलीप पाटील अध्यक्षपदावरुन बोलताना म्हणाले की,”समाजाची सांस्कृतिक,साहित्यिक भूक भागवल्यास समाज सुसंस्कृत बनत जातो.आज समाजातील विकृती कमी करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिदध उद्योजक वसंत टाकळे,प्रा.दिलीप गोरे,सुभाष वाल्हेकर,विजय शिंदे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी वादळकार राजेंद्र सोनवणे यांनी केले.सूत्रसंचालन रुपाली भालेराव यांनी केले.

कार्यक्रमात झालेल्याला काव्य मैफिलीत किरण मोरे, वृषाली टाकळे, दिव्या भोसले, प्रीती सोनवणे,डाॅ.अनिता सूर्यवंशी, अश्विनी चौधरी, शालिनी साहरे, सुलभा चव्हाण, उषा वराडे, कांचन मास्ते, दिलीप गोरे,यशवंत घोडे, अमोल देशपांडे, पियुष काळे, रामदास घुंगटकर,चंद्रकांत सोनवणे, भाऊसाहेब आढाव, रामचंद्र पंडीत, शंकर घोरपडे, अनंत साळुंके ,अशोक सोनवणे यांनी काव्यरचना सादर केल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *