पौष पोर्णिमा १७ जानेवारी ते १९ जानेवारीला होणारी कोरठण खंडोबाची वार्षिक यात्रा रद्द

रामदास सांगळे
विभागीय संपादक
६जानेवारी २०२२

बेल्हे


महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान, पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) या “ब “वर्ग तीर्थक्षेत्रावरील पौष पोर्णिमा 17 जानेवारी ते 19 जानेवारी ला येणारी यात्रा कोरोनामुळे जिल्हा प्रशासन व देवस्थान समितीने यात्रा रद्द केल्याचा निर्णय संयुक्तपणे घेतला. या वर्षीच्या यात्रा नियोजनाबाबत प्रशासकीय बैठक सोमवार (दि. 3) जानेवारी रोजी सर्व विभाग प्रमुख तसेच देवस्थानचे विश्वस्त यांच्या समवेत श्रीगोंदा पारनेर विभागाचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थानमध्ये पार पाडली.

सदर बैठकीला तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे, देवस्थानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड, चिटणीस मनीषा जगदाळे, खजिनदार हनुमंत सुपेकर, आश्विनी थोरात, विश्वस्त किसन मुंडे, बन्सी ढोमे, दिलीप घोडके, देवीदास क्षीरसागर, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता एस. व्ही. दहिफळे, सरपंच सुरेखा वाळुंज, उपसरपंच महादेव पुंडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गोपीनाथ घुले, उपअभियंता एन एस. आहिरे, पोलीस नाईक भालचंद्र दिवटे, मंडल अधिकारी पंकज जगदाळे, कामगार तलाठी किरण फातले, ग्रामविकास अधिकारी भालेराव इ. उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी कोरोना बाबत लागलेल्या निर्बंधाची व शासकीय नियमांची माहिती देऊन यात्रा उत्सव मागील वर्षी प्रमाणे प्रतिनिधीक स्वरुपात मानांच्या काठ्या, पालख्या यांना परवानगी देण्याचे सांगितले. यात्रा काळात मंदिर दर्शन इत्यादी बाबी मागील वर्षी प्रमाणे बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार गर्दी न होण्याचे आणि यात्रेकरू व भाविक भक्त. यांच्या जिवितांचे कोरोनामुळे संरक्षण होण्यासाठी देवस्थान समिती व ग्रामपंचायत यांनी प्रशासनांच्या सूचना मान्य करून यात्रा उत्सव रद्द करण्यास संयुक्तपणे संमती केली.

सलग दुसर्‍या वर्षी यात्रा रद्द झाली असल्याने राज्यभरातून येणारे यात्रेकरू, भाविक भक्त, मिठाई दुकानदार, यांनी यात्रेला येऊ नये, देवस्थानजवळ कोणतीही दुकाने लावू नये, दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे प्रांताधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, देवस्थान अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड यांनी केले आहे. यात्रा काळात मंदिराकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांकडून सील करण्यात येणार आहेत याची सर्च भाविक भक्त, यात्रेकरूंनी नोंद घ्यावी.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *