साई चौक जगताप डेअरी ग्रेडसेपरेटचे उद्घाटन राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते संपन्न

रोहित खर्गे
विभागीय संपादक
५ जानेवारी २०२२

पिंपरी


साई चौक जगताप डेअरी ग्रेडसेपरेटरचे उदघाटन शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. आज दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी प्रभाग 28 रहाटणी – पिंपळे सदागर  येथील जगताप डेअरी साई चौक येथील वाकड वरून पिंपळे सौदागरला येणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे आज  पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री संजोग वाघेरे पाटील मा. विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक  विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते फीत कापून नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

यावेळी नगरसेवक मयुर कलाटे नगरसेविका  शितलताई नाना काटे, सागर कोकणे,उद्योजक शिरीष साठे, सुमित डोळस, गौरव शितोळे, उत्तम धनवटे आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे वा नगरसेविका शितलताई नाना काटे यांच्या पाठपुराव्याने या ग्रेड सेपरेटर चे काम पूर्ण करण्यात आले. या ग्रेड सेपरेटरमुळे आता या ठिकाणी होणारी वाहतुकीच्या  कोंडीचा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे. विशेषतः पिंपळे सौदागरहून आयटी पार्क हिंजवडीला जाणाऱ्या नागरिकांना पूर्वी सारखी वाहतूक कोंडीची समस्या भासणार नाही त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *