पिंपळगाव घोडे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीराचा कलश रोहणाचा कार्यक्रम ह.भ.प श्री पांडुरंग महाराज येवले यांच्या शुभहस्ते सपंन्न

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
६जानेवारी २०२२

घोडेगाव


आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील पिंपळगाव घोडे येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीराचा कलश रोहणाचा कार्यक्रम ह.भ.प श्री पांडुरंग महाराज येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभ हस्ते सपंन्न झाला. पहिल्या दिवशी पहाटे सकाळी आठच्या सुमारास कलशाची हरिपाठ मंडळाच्या उपस्थित तसेच हरिनामाच्या गजरात महिला -माता भगिनींनी गावातून प्रदक्षिणा व मिरवणुका काढली त्यानंतर ठिक १२ वाजता होमहवनाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला श्री बाळासाहेब लाडके,श्री अमोल भास्कर, जगदीश भास्कर,सपत्नीक होमहवन व पूजाविधीसाठी मान मिळाला. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता पिंपळगाव घोडे हरिपाठ मंडळाचे भजन झाले मोठया भक्तीभावाने सपंन्न झाले.


दुसऱ्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीराचा कलश रोहणाचा कार्यक्रम पार पडल्या नंतर सायंकाळी ७ वाजता ह.भ.प श्री अर्जुन महाराज फलके आमोंडी ह्यांचे किर्तन झाले व नंतर सर्व ग्रामस्त व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन हरिपाठ मंडळ व ग्रामस्थांनी केले तसेच नियोजन श्री अमोल भास्कर ,दीपक नाईक ज्ञानेश्वर ढमढेरे, निखील वाकचौरे ,प्रशांत गुंजाळ यांनी पाहिले. या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष श्री विवेक वळसे पाटील , भिमाशंकर साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप,मधु अप्पा बोऱ्हाडे , राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयसिंग काका काळे,घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे यांची उपस्थिती लाभली व त्यांनी मनोगत व्यक्त केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *