धालेवाडी येथे रासायनिक खतांचा वापर करून अज्ञात व्यक्तींनी कांदा केला खराब

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके
विघ्नहर कारखाना जवळ असलेल्या धालेवाडी तर्फे हवेली गावात काही अज्ञात व्यक्तींनी वैयक्तिक सुडाची आसूयेपोटी सुमारे चार एकर अरणी घातलेल्या कांद्यामध्ये रासायनिक खतांचा वापर करून कांदा खराब केला.
धालेवाडी गावचे प्रगतिशील शेतकरी व तंटामुक्तीचे अध्यक्ष मारुती उर्फ बबुशेठ पारवे यांच्या कांद्याच्या अरणीवर आठ दिवसांपूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी रासायनिक खतांचा मारा केला गेल्याने सुमारे दोन हजार पिशवी सडला गेल्याने सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कांदा चाळूनही तो विकण्यासारखा किंवा खाण्या योग्य राहिला नाही.

धालेवाडी गावचे शेतकरी व तंटामुक्ती अध्यक्ष मारुती (बबूशेठ)पारवे यांच्या कांद्याच्या अरणीवर 8 दिवसांपूर्वी काही अज्ञात व्यक्तींकडून खताचा मारा केला गेला सर्व 2000 पिशवी कांदा सडला असल्याचे वृत्त समजताच याबाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी विघ्नहर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सत्यशील दादा शेरकर धालेवाडी गावचे उपसरपंच सुभाष दळवी व ग्रामस्थ यांनी त्या ठिकाणी जाऊन घटनेची माहिती घेतली व श्री.मारुती पारवे यांस योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन व ज्या कोणी व्यक्तींनी हे कृत्य केले आहे त्यांचा पोलिस यंत्रणेमार्फत शोध घेतला जाईल असे श्री.शेरकर यांनी सांगितले.