शहराच्या वैभवात महिला क्रिकेट खेळाडूंनी रोवला मानाचा तुरा!…पिंपरी चिंचवड शहरातली तीन खेळाडूंची महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड


पिंपरी- दि २४ सप्टेंबर २०२१

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी-चिंचवडमधील तीन क्रिकेटपटूंचा महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात समावेश झाला आहे.  शहरातील स्वांजली संजय मुळे ,खुशी मुल्ला व श्रावणी देसाई  या तीन खेळाडूंची महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पुणे जिल्ह्यातील क्रिकेट चाहत्यांनी स्वागत केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

स्वांजली मुळे हिने मागील हंगामात आसाम गोहाटी येथे  क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्रातर्फे १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे १९ वर्षाखालील महिलांसाठी ५० षटकांच्या एक दिवसीय सामन्याची स्पर्धा होते, त्या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने स्वांजली सहित खुशी मुल्ला व श्रावणी देसाई या तीन खेळाडूंची निवड झाली आहे, स्पर्धेपूर्वी पुणे येथील गोवा महिला संघासोबत सराव सामने देखील खेळविण्यात आले आहेत. महाराष्ट्र संघाचा समावेश एलटीडी गटात असून या महिला संघाचे एकदिवसीय सामन्याच्या स्पर्धचे साखळी सामने २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान सूरत येथे खेळवले जाणार आहे.

स्वांजली मुळे ही थेरगाव येथील व्हेरॉग वेंगसरकर
अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक निरंजन गोडबोले आणि वेंगसरकर अकादमीचे प्रशिक्षक मोहन जाधव, भूषण सुर्यवंशी या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळत आहे.

या तिघींचा महाराष्ट्राच्या संघात समावेश झाल्याने आमदार महेश लांडगे यांच्याकडून अभिनंदन करून स्पर्धेत उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हेरॉग वेंगसरकर अकॅडमीमध्ये अत्यंत उच्च दर्जाचे प्रशिक्षण आम्हाला दिले जाते. यामधून मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खेळण्यासाठी नक्कीच आम्ही सक्षम होतो आणि विशेष म्हणजे घरच्यांकडून मिळालेले पाठबळ हे खुप मोलाचे असते.

– स्वांजली मुळे, क्रिकेटपटू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *