महाविकास आघाडीत एकवाक्यता नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

३१ डिसेंबर २०२२

नागपूर


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास विकास आघाडीत सावळा गोंधळ होता, त्यांच्याच एकवाक्यता नव्हती, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी केली.

विरोधी पक्षाने अध्यक्षांवर भेदभाव केल्याचा आणि विरोधी पक्षाला बोलू न दिल्याचा आरोप केला. विरोधी पक्षातील काही सदस्यांनी तर विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वासाचे पत्र विधिमंडळ सचिवांना दिले. यावर मुख्यमंत्री म्हणाले, आजवर अशाप्रकारे खालच्या पातळीवर आरोप झाले नव्हते. ही अतिशय निंदनीय बाब आहे. शिवाय त्यांनी अविश्वासाबाबत आधी नियमांची माहिती करून घ्यायला हवी होती. पवार यांनी त्या पत्रावर स्वाक्षरी न करणे हे त्यांच्यात एकवाक्यता नसल्याचे द्योतक आहे.आमच्या सरकारचे पहिलेच अधिवेशन विदर्भात होते. विदर्भाला भरभरून देण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधी पक्षाने आमची बदनामी केली. त्यासाठी ते सभागृहाबाहेर घोषणा देत होते तसेच सभागृहात कमी आणि सभागृहाबाहेर अधिक चर्चा करीत होते, असेही शिंदे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *