मंगरूळमध्ये बिबट्याने पाडला दोन कालवडींचा फडशा…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.10/6/2021

मंगरूळमध्ये बिबट्याने पाडला दोन कालवडींचा फडशा

बातमी:- विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

मंगरूळ (ता.जुन्नर) येथील शिवराम लक्ष्मण कसळा यांच्या जनावराच्या गोठ्यावर आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गोठ्यातील २ कालवडी ठार केल्या. ३ वर्षे वयाची कालवड तर दुसरी १ वर्ष वयाची कालवड होती.यामध्ये शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी सबंधित शेतकऱ्याने केली आहे.जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पाळीव प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात बिबट्याचे हल्ले वाढले असल्याने परिसरात भीतीच वातावरण पसरलं आहे.

Advertise

या भागातील नागरिकांना नियमित बिबट्याचे दर्शन होते. वन विभागाने या भागात ताबडतोप पिंजरे लावावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. संबंधित घटनेचा पंचनामा पारगाव तर्फे आळे ची वनरक्षक के.एस.नायकवाडी यांनी केला आहे.