विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं एकपक्षीय काम, ते लोकशाहीचा गळा घोटतायेत – संजय राऊत

३० डिसेंबर २०२२


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडला आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्याला या ठरावाबद्दल काही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. यावर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे.

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असून घटनात्मक पदावर असताना ते एकपक्षीय काम करतात हा आरोप आहे. ते विरोधी पक्षांना बोलू देत नाहीत. ते लोकशाहीचा गळा घोटतात. पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं वागतात, बोलतात आणि काम करतात. नियम पाळले जात नाहीत. घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती राज्यपाल असो किंवा विधानसभा अध्यक्ष असो, त्यांनी पक्षपाती वागू नये. त्यांनी नियम, कायदे आणि घटनेचं पालन करावं. त्या खुर्चीववर बसलेले असताना तुम्ही पक्षाची वस्त्रं आणि चपला काढून ठेवल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून हे होत नाही, असा आरोप संजय राऊतांनी केला.

विरोधी पक्षाचा आवाज दाबला जात असून विशेषत: शिवसेनेच्या लोकांना बोलूच दिलं जात नाही. शिवसेनेच्या सदस्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त के्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खालून काय इशारा करतात त्यावरुन निर्णय घेणं गंभीर बाब आहे. अजित पवार यांनाही ही माहिती आहे. अजित पवारांची सही झाली की नाही याबद्दल माझ्याकडे माहिती नाही,असं संजय राऊतांनी सांगितलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *