१ कोटी ७० लाख रुपयांची दारू जप्त; ७ जण अटकेत

दि. ३०/१२/२०२२
पुणे


पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातील नवले पूल आणि तळेगाव दाभाडे येथे कारवाई करून दोन ट्रकमधून १ कोटी ७० लाख रुपयांची दोन हजार बॉक्स देशी बनावटीची विदेशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी ७ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी काही जणांवर आधीही अवैध दारू वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून एक चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

रमेश कुमार झुंजाराम डुडी, बाबुलाल त्रिलोकराम, शेखर नेताजी भोसले, अभिजीत दिगंबर डोंगरे, रोहीत जालिंदर खंदारे, विरा राम, पुना राम चौधरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ही दारू गोव्यातून पुणे, गुजराथ, राजस्थान आणि कर्नाटक येथे पाठविली जाणार होती.ट्रकमध्ये एखादी दारूची बाटली फुटली तर वास येण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोपींनी संशय येऊ नये म्हणून दोन्ही ट्रकमध्ये डांबराच्या गोळ्या पसरून ठेवल्या होत्या.

या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क्, सासवड विभाग व तळेगाव दाभाडे विभाग, करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *