रेल्वे उड्डाणपुलाखालील गाळे दुरुस्तीवर होणार दीड कोटींचा खर्च

२९ डिसेंबर २०२२

पिंपरी


रेल्वे उड्डाणपुलाखालील अस्तित्वातील गाळ्यांची दुरुस्ती करण्यात येणार असून ,यासाठी एक कोटी ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे . या विषयासह चिंचवड येथील नियोजित ठिकाणी महापालिकेची नवीन  प्रशासकीय इमारत बांधण्याच्या आणि शहरातील १८ मीटर व त्यावरील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या विषयाला प्रशासक शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे . पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये प्रशासक शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली . या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील , जितेंद्र वाघ , उल्हास जगताप आणि अधिकारी उपस्थित होते.

महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विकासविषयक कामांच्या सुमारे ६७२ कोटी ८१ लाख रुपये खर्चाच्या मंजुरीचे विषय प्रशासक सिंह यांच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते . त्याला मंजुरी दिली . प्रभाग ११ कृष्णानगरअंतर्गत दिवाबत्ती व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीसाठी येणाऱ्या २३ लाख रुपये खर्चास , प्रभाग क्रमांक १२ अंतर्गत दिवाबत्ती व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीविषयक कामे करण्यासाठी २३ लाख रुपये खर्चास , मुंबई – पुणे महामार्गावरील दिव्यांची चालन देखभाल दुरुस्तीसाठी येणाऱ्या ३१ लाखांच्या खर्चास मान्यता दिली . जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर २३ येथे निर्जंतुकीकरण प्रक्रियेसाठी १ कोटी २४ लाख खर्च अपेक्षित आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *