पवार कुटुंबियांविरोधात लवासा प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची मागणी

२९ डिसेंबर २०२२


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबियाविरोधात लवासाप्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कुटुंबियाविरोधात लवासाप्रकरणी सीबीआयमार्फत कारवाईचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे पवार कुटुंबियांच्या अडचणी वाढू शकतात.

पुण्यातील लवासा प्रकरणात मूळ तक्रारदार नानासाहेब जाधव यांची मुंबई हायकोर्टात नव्यानं याचिका दाखल केली आहे. पुणे जिल्ह्यातील लवासा प्रकल्पाबाबत याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप काही प्रमाणात खरे असले तरीही त्यांनी त्याला आव्हान देण्यास बराच उशीर केला आहे. असे निरीक्षण नोंदवत तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने लवासा विरोधातील याचिकेवर निकाल दिला होता.

लवसा प्रकरणी जनहित याचिका करणारे मूळ याचिकाकर्ते वकील ॲड. नानासाहेब जाधव यांनी नव्याने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुबियांचे निकटवर्तीय मानले जाणारे अजित गुलाबचंद यांच्या नावाचाही या याचिकेत यांचा समावेश आहे. या निकालातील निष्कर्षांचा दाखला देऊन लवासा प्रकरणाशी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसह शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर फौजदारी कारवाईचे आदेश देण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात करण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *