लोणावळ्यात होणाऱ्या वर्षअखेर पार्ट्यांवर पोलिसांची नजर

दि. २९/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : लोणावळ्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्या कालावधीत होता असलेल्या पार्ट्यामध्ये अनेकदा वेळेचे बंधन, ध्वनीविषयक मर्यादा, मद्यप्राशनाचे नियम यामचा भंग होता असतो. त्याचा परिणाम सार्वजनिक शांतताभंगासारखे प्रकार उद्भवतात. त्याला आळा घालण्यासाठी लोणावळा पोलीस या वर्षी वर्षअखेर पार्ट्यांवर करडी नजर ठेवणार आहेत.

यासंदर्भात बोलताना लोणावळ्याचे पोलिस निरीक्षक सीताराम डुबल म्हणाले; पोलीस प्रशासनाकडून शहराच्या एंट्री पाॅईटवर चेकपोस्ट लावत वाहनांची तपासणी केली जाणार आहे. शहरामध्ये थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात असून पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.पर्यटनस्थळे व गर्दीच्या ठिकाणी मद्यप्राशन करुन धिंगाणा घालणारे पर्यटक, वेगात वाहन चालविणारे चालक, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणारे हुल्लडबाज यांच्यावर कारवाई करण्यासाठी वेगळी पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. लोणावळ्यात आल्यानंतर पर्यटक हे हाॅटेल व खाजगी बंगले यामध्ये राहतात. त्यामुळे हाॅटेल व बंगले चालकांची मिटिंग घेत त्यांना सुरक्षेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. येणार्‍या प्रत्येक पर्यटकांचे ओळखपत्र तपासणे, त्यांची रजिस्टरमध्ये नोंद करणे, मेटल डिटेक्टर आदी अद्ययावत ठेवणे, हाॅटेलचा परिसर सीसीटिव्ही कक्षेत ठेवणे आदी सू चना दिल्या असून काही अनुचित प्रकार घडल्यास हाॅटेल व्यावसायिक व बंगलेचालक यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *