थंडी सुरू होताच व्यायामास प्राधान्य

०१ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


दिवाळी संपली , थंडी पडण्यास सुरुवात झाली आणि ज्येष्ठांसह तरुणाईमध्ये व्यायामाची अधिकच आवड निर्माण झाली आहे . सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये पहाटे उठून उद्यानामध्ये , रस्त्यांवर व मोकळ्या मैदानात व्यायाम करण्यासाठी नागरिकांची पावले वळू लागली . जॉगिंग वॉकिंग तसेच पारंपरिक व्यायाम करण्यावर नागरिक भर देत आहेत . प्राधिकरणातील उद्याने , रस्ते व मोकळी मैदाने सकाळच्या वेळेत व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे गजबजून गेली आहेत ज्येष्ठ नागरिक तरुणाई व बालकेही व्यायामाची आवड जोपासत आहेत.

प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यान तसेच विविध उद्यानांत नागरिक येत आहेत . तसेच हास्य योग मंडळाचे सदस्य मनसोक्त हास्य सागरात बुडून निखळ आनंद अनुभवत आहेत . चालण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे . अनेक ज्येष्ठ चालण्याचा व्यायाम करीत आहेत .ड जीवनसत्वाचा लाभ घेण्यासाठी कोवळ्या उन्हामध्ये बसून , नागरिक एकाग्र होऊन ध्यान साधनेवर भर देत आहेत . संगीताच्या तालावर मनोरंजनासह व्यायामाची अनुभूती ज्येष्ठ अनुभवत आहेत . तरुणाई मात्र , वेगात धावून व्यायामाचे विविध प्रकार करताना दिसून येत आहे . उद्यानामध्ये बसविलेल्या आधुनिक व्यायाम साधनांचा उपयोग करून नागरिक हात , पाय , कंबर , पोट व शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *