नवीन वर्षात अनधिकृत नळजोडधारकांवर कारवाई

दि. २८/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील अनधिकृत नळजोड तोडण्याची मोहीम १ जानेवारी पासून हाती घेणार आहे. अनधिकृत नळजोडधारकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी ही माहिती दिली.

अनधिकृत नळजोड नियमित करून घेण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत आहे. घरगुती अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी नागरिकांनी तातडीने अर्ज सादर करून नळजोडणी अधिकृत करून घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. शहरातील अनधिकृत नळजोडणीच्या तक्रारी लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील अनाधिकृत नळ जोडणी नियमित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा यासाठी नळजोड नियमितीकरण मोहिमेस मुदतवाढ देण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *