बातमीदार- रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक
दि २४ नोव्हेंम्बर २०२०, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत दिवंगत महापौर मधुकरराव पवळे यांच्या प्रतिमेस आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, उपायुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.
त्यानंतर निगडी येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासही उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, आरोग्यधिकारी शिंदे, नगरसेविका सुमनताई पवळे, संतोष कवडे, संदीप कवडे, रामा भैय्या, प्रदीप पडवळ, ओमकार पवळे, व आण्णा वर प्रेम करणारे कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. निगडी येथील अण्णांच्या पूर्णकृती पुतुळा परिसरात विद्युत रोषणाई व कारंजे यामुळे परिसर शोभून दिसत आहे.