पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात होणार सातवा वेतन आयोग लागू

दि. २७/१२/२०२२
पुणे


पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात सातव्या वेतन आयोगानुसार वेतन लागू होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या वेतनात वाढणाऱ्या वेतनाची ५० टक्के रक्कम जमा केली जाणार आहे.

जानेवारी २०२३ मध्ये या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक होणार आहे. त्यानंतर सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर उर्वरीत ५० टक्केवाढीनुसार, वेतन देण्यास सुरूवात केली जाणार आहे.

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी नाना भानगिरे यांच्यासह कामगार प्रतिनिधी नरेंद्र आवारे, श्रवण तौर, उमेश पांढरे यांची बैठक घेतली. त्यानंतर, सोमवारी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या विषयाचा पाठपुरावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला होता. याविषयी बोलताना भानगिरे म्हणाले की, पीएमपीमधील सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार असून जानेवारी महिन्यात याबाबत अंतिम निर्णय होऊन. त्यानंतर आयोगानुसार, उर्वरीत ५० टक्के रकमेचे वेतन सुरू केले जाणार आहे. याशिवाय, पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी जागा निश्चित करणे, वैद्यकीय बिलांसाठी तातडीने निधी उपलब्ध करणार आहे. तसेच डेपोच्या परिसरात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे, कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन सुरू करण्यात यावे, अशा मागण्याही मान्यता करण्यात आल्याचे भानगिरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, ” पीएमपी कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या नुसार, वेतनाच्या फरकात ५० टक्केवाढ केली जाणार आहे. त्याबाबत आज मंगळवारी अधिकृत आदेश काढला जाणार आहे असे पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बखोरिया यांनी बोलताना सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *