शिवसैनिकांचा कार्यकर्ता मेळावा शिक्रापूर येथे आयोजित केल्याप्रकरणी, आयोजक व तालुकाध्यक्ष सुधीर फराटे यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा केला दाखल

विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिक्रापूर : दि. 07/09/2021.

Shikrapur police has registered a case against organizer and taluka president Sudhir Farate for organizing Shiv Sainik activists' rally at Shikrapur.
शिवसैनिकांचा कार्यकर्ता मेळावा शिक्रापूर येथे आयोजित

रविवार दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्रापूर येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात, शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला होता. यावेळी ज्येष्ठ नेते रवींद्र मीर्लेकर, शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन व नियोजन, शिरूर तालुका प्रमुख सुधीर बाळासाहेब फराटे (इनामदार) यांनी केलेले होते. तशा प्रकारच्या निमंत्रण पोस्ट देखील त्यांच्याकडून सोशल मीडियावर टाकलेल्या होत्या.

या कार्यक्रमाबाबतचा हा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून, गुन्हा दाखल होणार का?

खासदार संजय राऊत यांची शिरूर तालुक्यातील मेळाव्याआधीची सभा व मेळावा, हा जुन्नर तालुक्यात झालेला होता. तेथे पोलीस प्रशासनाने आयोजकांवर, गर्दी जमविल्याबाबत गुन्हा दाखल केलेला होता. त्यामुळे, शिरूर तालुक्यातील झालेल्या मेळाव्यामुळे, येथील कार्यक्रमाचे आयोजकांवर गुन्हा दाखल होईल अशी चर्चा चालू होती. अशी चर्चा वाढताच दुसऱ्या दिवशी शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमविल्याप्रकरणी व त्या अंतर्गत नियम तोडल्याप्रकरणी, शिवसेनेचे शिरूर तालुकाध्यक्ष सुधीर फराटे यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय.

Sanjay Raut in Car

आयोजक व तालुकाध्यक्ष सुधीर फराटे यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा केला दाखलशिक्रापूर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यावेळी, शिवसेना नेते संजय राऊत व रवींद्र मीर्लेकर यांच्याकडे, उपस्थित अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत असल्याबाबतच्या तक्रारी, अनेकांनी सभा चालू असतानाच जाहीर सभेत केलेल्या होत्या. त्यावर, संजय राऊत यांनी भाषणातच जाहीरपणे स्थानिक आमदारांचे नाव न घेता, त्यांच्याबाबतची नाराजी जाहीर भाषणात व्यक्त केली होती. तसेच, याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पा. तसेच वरिष्ठांशी बोलणार असल्याबाबतचे वक्तव्य केले होते.

परंतु आता, या कार्यक्रमाबाबतचा हा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून, गुन्हा दाखल होणार का ? या प्रश्नचिन्हाला आता पूर्णविराम मिळालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *