राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर; शरद पवारांचे वारकऱ्यांना संयम राखण्याचे आवाहन

२६ डिसेंबर २०२२


सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर वारकऱ्यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी वारकऱ्यांबरोबर सोमवारी चर्चा केली. वारकऱ्यांची भूमिका जाणून घेत पवार यांनी संमय राखण्याचे आवाहन केले. सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात वारकरी आक्रमक झाले आहेत. राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली.

शरद पवार आणि वारकऱ्यांमध्ये तासभर चर्चा झाली. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यावेळी उपस्थित होते. वारकऱ्यांची भूमिका आणि त्यांचे म्हणणे शरद पवार यांनी ऐकून घेतले. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत वारकरी संप्रदायाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.वारकरी संप्रदायाच्या साहित्याचा खरा प्रचार व्हावा, असा सल्लाही शरद पवार यांनी वारकऱ्यांना दिला; तसेच संयम बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *