‘डॉ.पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२२’ सोहळा उत्साहात

विश्वास कुलकर्णी,ह.भ.प.सोन्नर,प्रा.काकिर्डे,नीलिमा जोरवर यांचा सन्मान

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२२’ शनिवारी सकाळी आझम कॅम्पस येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.ज्येष्ठ आर्किटेक्ट व्ही.के.ग्रुपचे संस्थापक विश्वास कुलकर्णी(आर्किटेक्चर क्षेत्रात ५० वर्षे योगदान) ,ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर( लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष कीर्तन प्रबोधन),ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे( अर्थ साक्षरता ),’कळसुबाई मिलेट्स’ उत्पादक शेतकरी कंपनीच्या संस्थापक नीलिमा जोरवर ( भरडधान्य प्रसारातून महिला सक्षमीकरण ) यांचा सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ शैक्षणिक-सामाजिक कार्यकर्ते,अझीम प्रेमजी विद्यापीठाचे माजी मुख्य समन्वयक प्रशांत कोठडिया यांच्या हस्ते हा सोहळा झाला.सोहळा आयोजनाचे हे चौदावे वर्ष होते. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी संस्थाअंतर्गत पुरस्कारासाठी डॉ.रोनिका आगरवाल (प्राचार्या,रंगूनवाला कॉलेज ऑफ फिजीओथेरपी ), दिलीप देवडे( झेड.व्ही.एम युनानी मेडिकल कॉलेज गार्डनिंग विभाग) यांचा गौरव करण्यात आला.श्यामसुंदर सोन्नर यांच्या वतीने त्यांची कन्या ज्ञानेश्वरी सोन्नर यांनी सन्मान स्वीकारला.

संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले.महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी आभार मानले.‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२२ ‘प्रदान कार्यक्रम २४ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आझम कॅम्पसच्या असेम्ब्ली हॉल मध्ये पार पडला.जबीन सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.अफझल खान,सौ गौरी बीडकर,डॉ किरण भिसे,डॉ शैला बुटवाला,डॉ अनिता फ्रांत्झ,आदित्य बीडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप होते. डॉ.पी. ए. इनामदार यांचा ७८ वा वाढदिवस २८ डिसेंबर रोजी आहे. त्याही दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना प्रशांत कोठडिया म्हणाले,’हा सन्मान ज्यांना मिळाला ते सर्व मान्यवर हे सर्जनशील असून मातीशी इमान राखणारे आहेत. हा सृजनाचा सन्मान आहे.कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली परंपरा असून कृतज्ञतेची हीच शिदोरी घेऊन आपण नव्या वर्षात प्रवेश केला पाहिजे’.नीलिमा जोरवर म्हणाल्या,’सर्व प्रकारच्या प्रदूषणाबद्दल आपण बोलत असलो,तरी अन्न प्रदूषणाबद्दल अजिबात जागृती दिसून येत नाही.रानभाज्या,भरड धान्य(तृण धान्य) आहारात वाढवून परकीय प्रभावाचे अन्नग्रहण कमी केले पाहिजे.तृण धान्य उत्पादक स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराशी जोडले पाहिजे.विश्वास कुलकर्णी,नंदकुमार काकिर्डे,ज्ञानेश्वरी सोन्नर,डॉ रोनिका अगरवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *