महाविकास आघाडीने काही प्रतिसाद दिला नाही तर फक्त स्वबळावर लढण्याचा पर्याय आमच्याकडे आहे – प्रकाश आंबेडकर

१७ नोव्हेंबर २०२२


राज्यात सध्या ठाकरे गट आणि वंचित बहजुन आघाडीच्या युतीच्या चर्चा रंगल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानाला भेट दिली. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि त्यांची भेट झाली. या भेटीत इंदू मिलच्या जागी उभ्या राहणाऱ्या स्मारकाबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही भाजपाबरोबर जाऊ शकत नाही. आम्ही त्यांच्यासमोर काही मुद्दे उपस्थित केले आहेत. समाजरचनेसंबंधी आमचं भांडण आहे. जोपर्यंत त्यासंबंधी विचार केला जात नाही तोपर्यंत भाजपासोबत जाण्याचा संबंध नाही. जे कोणी भाजपासह जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने काही प्रतिसाद दिला नाही तर फक्त स्वबळावर लढण्याचा पर्याय आमच्याकडे आहे असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *