अंबानी कुटुंब तब्बल तीनशे किलो सोनं करणार दान

२४ डिसेंबर २०२२


मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानी आपल्या जुळ्या मुलासह भारतात आली आहे. तिच्या येण्याच्या आनंदात अंबानी कुटूंब तब्बल तीनशे किलो सोनं दान करणार आहे.

ईशा आणि तिचे पती आनंद पिरामल हे त्यांच्या जुळ्या बाळांसोबत आज पहिल्यांदाच अमेरिकेतून भारतात आले आहेत. त्यांच्या आगमनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. एवढंच काय तर बाळांची काळजी घेण्यासाठी फ्लाईटमध्ये अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत होती. नातवंड पहिल्यांदा भारतात येत असल्याने अंबानी कुटूंब आनंदीत होतं. आपला आनंद व्यक्त करण्यासाठी ते आज तब्बल ३०० किलो सोनं दान करणार आहे.

बाळांच्या स्वागतासाठी अंबानी कुटूंबाने जय्यत तयारी केली आहे. ईशा अंबानीच्या ‘करुणा सिंधू’ नावाच्या घरी तब्बल एक हजार साधूसंत येणार आहेत. याचवेळी अंबानी कुटुंबं तब्बल ३०० किलो सोनं दान करणार. यासोबतच अंबानी आणि पिरामल कुटुंबा एकत्र मिळून पाच अनाथाश्रम सुरु करणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *